शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:54 IST

सांगली : शहर व परिसरात रविवारी सायंकाळी पुन्हा ढगांची दाटी व पावसाचा शिडकावा सांगलीकरांनी अनुभवला. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आगामी चार दिवस पावसाचे संकेत मिळत आहेत.दोन दिवसांपूर्वी सांगलीत मुसळधार पाऊस झाला होता. रविवारीही ढगांची दाटी झाली होती. मोठ्या पावसाची चिन्हे दिसत होती. पण पावसाचा केवळ शिडकावा झाला. रात्री उशिरापर्यंत ...

सांगली : शहर व परिसरात रविवारी सायंकाळी पुन्हा ढगांची दाटी व पावसाचा शिडकावा सांगलीकरांनी अनुभवला. भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आगामी चार दिवस पावसाचे संकेत मिळत आहेत.दोन दिवसांपूर्वी सांगलीत मुसळधार पाऊस झाला होता. रविवारीही ढगांची दाटी झाली होती. मोठ्या पावसाची चिन्हे दिसत होती. पण पावसाचा केवळ शिडकावा झाला. रात्री उशिरापर्यंत हे वातावरण कायम होते. आगामी चार दिवस मान्सूनपूर्व पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. सायंकाळच्या वेळी विजांच्या कडकडाटासह पावसाची चिन्हे आहेत.दरम्यान, जिल्ह्याच्या सरासरी तापमानात घट झाली आहे. रविवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस इतके नोेंदले गेले. किमान तापमान २३ अंशावर आहे. येत्या चार दिवसात हे तापमान ३0 अंशापर्यंत खाली येईल, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. तापमानात घट होत असल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.तासगाव तालुक्यात पावसाची हजेरीतासगाव तालुक्यात रविवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी सहा वाजल्यानंतर शहरासह पूर्व तालुक्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तालुक्यात वायफळे, सावळज, मांजर्डे, बस्तवडे, गौरगाव, मणेराजुरी, हातनूरसह तालुक्यातील बहुतांश ठिकाणी रविवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे मोडून रस्त्यावर पडली होती. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या पावसामुळे खरिपाच्या मशागतींना वेग येणार आहे. पानी फौंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावात श्रमदान तसेच यंत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्याचे काम झाले आहे. या पावसामुळे वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून काम झालेले सीसीटी, डीपसीसीटी भरुन राहिल्याने गावकºयांतून समाधान व्यक्त होत होते.जतमध्ये वादळी वाºयासह पाऊसजत : जत शहर आणि तालुक्यात बहुतांश ठिकाणी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्यादरम्यान वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह दमदार अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस खरीप हंगाम पेरणीसाठी व पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. या अवकाळी पावसामुळे उन्हाळी मका, कापूस, भुईमूग, ऊस या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, तर आंबा, लिंबू, डाळिंब, जांभूळ अशा फळपिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.विटा परिसरात दमदार हजेरीविटा : येथे जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाºयासह पावसाने सुरुवात केली. पाऊणतास पाऊस पडत होता. वीजपुरवठा खंडीत होता. विटा परिसरासह पारे, बामणी, मंगरूळ, चिंचणी, आळसंद आदी भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. खंबाळे (भा.), कमळापूर, रामापूर, भाळवणी, ढवळेश्वर, कळंबी आदी भागात वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.